26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीय‘हॅलो, मी देशाचा सरन्यायाधीश... मला ५०० रुपये पाठवा बरं!

‘हॅलो, मी देशाचा सरन्यायाधीश… मला ५०० रुपये पाठवा बरं!

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्याबाबत घडलेल्या घटनेची होतेय चर्चा

नवी दिल्ली : देशात सायबर फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात, पण आता असे फ्रॉड करणा-यांची हिम्मत इतकी वाढली आहे की त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड यांना देखील सोडले नाही. दरम्यान या प्रकरणाची गंभीरता लक्षात न्यायालय प्रशासनाने पोलिसांना या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. देशाच्या न्यायव्यवस्थेत सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या नावाने असा फ्रॉड केला जाण्याचे हे पहिलेच प्रकरण असावे. सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

मीडीया रिपोर्टनुसार मंगळवारी रात्री एक सोशल मीडिया पोस्टच व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. या पोस्टच्या स्क्रीनशॉटमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा फोटो लावलेल्या प्रोफाइलवरून एक मेसेज पाठवण्यात आल्याचे दिसत आहे. या मेसेजमध्ये चीफ जस्टिस यांच्या नावाचा वापर करून फ्रॉड करणा-या व्यक्तीने लिहिले आहे की हॅलो, मी सीजेआय आहे, माझी कॉलेजियममध्ये तातडीची बैठक आहे आणि मी कॅनॉट प्लेसमध्ये अडकलो आहे.

एवढेच नाही तर फसवणूक करणा-यांनी सरन्यायाधीशांच्या नावाने तुम्ही कॅबसाठी ५०० रुपये पाठवू शकता का? न्यायालयात पोहोचल्यानंतर मी ते परत करीन असेही म्हटले आहे. दरम्यान काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय प्रशासन तत्काळ सक्रिय झाले आणि पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देत ​​आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

सायबर पोलिस या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे. पोलिस सध्या फ्रॉड करणा-यांचा शोध घेत आहेत. सायबर फ्रॉडची संख्या गेल्या काही दिवसात देशात प्रचंड वाढली आहे. आर्टिफीशयल इंटेलिजन्सचा वापर वाढल्यानंतर अनेक नव्या पद्धती वापरून फ्रॉड केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR