27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रबाळाच्या लसीकरणासाठी हॅलो व्हॅक्सी योजना

बाळाच्या लसीकरणासाठी हॅलो व्हॅक्सी योजना

मुंबई : प्रतिनिधी
बाळांचे लसीकरण करताना अनेक मातांचा गोंधळ उडतो. लसीकरणाची तारीख लक्षात राहत नाही. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरणाची माहिती मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मातांना लसीकरणाची इत्यंभूत माहिती व्हावी, यासाठी ‘हॅलो व्हॅक्सी’ हे व्हॉट्स अ‍ॅप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे. सध्या हे चॅटबॉट इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध असून, लवकरच ते मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युएसएड, मोमेंटम रूटीन इम्युनायझेशन ट्रान्सफोर्मेशन अ‍ॅण्ड इक्विटी प्रकल्प यांच्या सहकार्याने ‘हॅलो व्हॅक्सी’ हे व्हाट्स अ‍ॅपचॅट बॉट तयार करण्यात आले आहे. बाळाच्या लसीकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यासाठी आणि गैरसमज दूर करून लसीकरणात मदत करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. ही माहिती मराठीत उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. लवकरच काम पूर्ण होऊन हे अ‍ॅप मराठी भाषेमध्येही उपलब्ध होणार आहे. ‘हॅलो व्हॅक्सी’ व्हॉट्स अ‍ॅप चॅटबॉट वापरण्यासाठी ८९२९ ८५०८५० या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवल्यानंतर विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात.

त्यातील योग्य तो पर्याय निवडून लसीकरणाविषयी आवश्यक माहिती जाणून घेता येते. यात बाळाचे लसीकरण वेळापत्रक, तसेच नकाशाद्वारे जवळील आरोग्य केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ‘हॅलो व्हॅक्सी’ व्हॉट्स अ‍ॅप चॅटबॉट नागरिकांसाठी २४ तास लसीकरण मित्र बनेल, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिका-याने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR