25.3 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमनोरंजनहीना खानला तिस-या स्टेजचा कॅन्सर

हीना खानला तिस-या स्टेजचा कॅन्सर

मुंबई : वृत्तसंस्था
टीव्ही अभिनेत्री हीना खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. हीना खान हिला तिस-या स्टेजचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. खुद्द हीनानेच याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. हीनाला तिस-या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.

अनेक दिवसांपासून हीनाला कॅन्सर झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता हीनाने स्वत:च आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत या चर्चेवर शिक्कामोर्तब केले आहे.

‘जे माझ्यावर प्रेम करतात, माझी काळजी करतात त्यांच्यासोबत मला एक महत्त्वाची बातमी शेअर करायची आहे. मला तिस-या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाला असून, यावर उपचार सुरू आहेत. भयंकर त्रास होत असला तरी मी खात्री देते की मी ठीक आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी मी तयार आहे. मला खंबीर बनवणारी प्रत्येक गोष्ट करायला मी तयार आहे.’ असे हीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

पुढे हीनाने आपल्या प्रायव्हसीबाबतही लिहिले आहे. मी आपल्या प्रेमाचा आदर करते. मात्र सध्या आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. मला आणि माझ्या कुटुंबियांना विश्वास आहे की मी लवकरच कॅन्सरवर यशस्वी मात करेन. सध्या तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाची मला गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR