23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयहिंडेनबर्गचे नवे आरोप गंभीर

हिंडेनबर्गचे नवे आरोप गंभीर

अध्यक्षांवरील आरोपामुळे सेबीची अखंडता धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिंडेनबर्गच्या अहवालात सेबीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सेबीची अखंडता धोक्यात आली आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. गुंतवणूकदारांनी कष्टाने कमावलेला पैसा गमावला तर पंतप्रधान मोदी, सेबी अध्यक्षा, गौतम अदानी यापैकी कोण जबाबदार असेल, असा सवाल कॉंग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला. अदानींवर लावलेले नवीन आरोप आणि याची गंभीरता पाहता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची पुन्हा चौकशी करेल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी नवीन अहवाल सादर केला. यामध्ये शेअर्स मार्केट नियामक सेबीच्या प्रमुख माधवी पुरी आणि गौतम अदानी यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला. या आरोपावरून देशातील राजकारण तापले आहे. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंडेनबर्ग अहवालाच्या आधारे सेबीवर प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर सेबीकडून तपास करण्यात येत असल्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जिवलग मित्राला (अदानी) वाचवण्याचा कट रचल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी केला. अदानी मेगा घोटाळ््याचा तपास सेबीकडे देण्यात आला होता. मात्र, आता सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांचाही अदानी मेगा घोटाळ््यात सहभाग असल्याचे हिंडेनबर्गच्या अहवालात म्हटले आहे. या घोटाळ््याची चौकशी करणारी व्यक्तीच या घोटाळ््यात सहभागी असेल तर चौकशी कशी होणार, असा सवाल उपस्थित करीत या महाघोटाळ््याची चौकशी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत करायला हवी. मात्र, मोदी सरकार जेपीसी स्थापन करण्यास तयार नाही. पीएम मोदी किती दिवस अदानींना वाचवू शकतील, असा सवालही जयराम रमेश यांनी उपस्थित केला.

सेबीप्रमुखांच्या अदानींबरोबर बैठका
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर हिंडेनबर्ग अहवालाबाबत गंभीर आरोप केले. २०२२ मध्ये सेबीचे प्रमुख झाल्यानंतर लगेचच माधबी पुरी बुच यांनी गौतम अदानींसोबत दोन बैठका घेतल्याचा दावा केला. त्यावेळी सेबी अदानी यांच्या व्यवहारांची चौकशी करत होती.

अदानी समुहाने आरोप फेटाळले
हिंडेनबर्ग यांनी लावलले आरोप अदानी समुहाने फेटाळून लावले. जाणीवपूर्वक आरोप केले जात असून, यामागे अदानी समुहाची प्रतिमा डागाळण्याचा हेतू असल्याचे दिसून येते,असे अदानी समूहाने म्हटले आहे. या आधीही असा प्रयत्न झाला. परंतु हे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. अदानी समूह आर्थिक व्यवहारात पूर्णपणे पारदर्शकता ठेवते, असेही स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR