27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयहिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही : आश्विन

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही : आश्विन

बंगळूरू : भारताचा प्रसिद्ध फिरकीपटू रविचंद्रन अश्वीन याच्या एका वक्तव्याने क्रीडा जगतातच नाही तर सगळीकडे काहूर माजले आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचा तो म्हणाला. तामिळनाडूमधून हिंदीला विरोध तीव्र होत असताना त्याचे वक्तव्य चर्चेत आले आहे. समाज माध्यमावर त्याच्या वक्तव्याची एकदम चर्चा होत आहे. रविचंद्रन याने तामिळनाडूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

रविचंद्रन अश्विन याने यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जर कोणी इंग्रजी अथवा तामिळ भाषेबाबत जागरूक नसेल तर तो हिंदीत प्रश्न विचारण्यासाठी कोणी इच्छुक आहे का? असा सवाल त्याने केला. अश्विन असे म्हणताच विद्यार्थ्यांमध्ये शांतता पसरली. रविचंद्रन अश्विन याच्या हिंदी भाषेच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांमध्ये चुळबुळ दिसली. त्यानंतर अश्विन म्हणाला की, मला हे स्पष्ट केले पाहिजे की, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. ही एक अधिकृत भाषा आहे.

हिंदी लादण्याचा आरोप
अश्विनीच्या वक्तव्यावर इतके काहूर का माजले असे अनेकांना वाटत असले तरी दक्षिणेतील राज्य त्यांची भाषिक ओळख टिकवून आहेत. त्यात तामिळनाडूतील सत्तारूढ डीएमकेसह विरोधी पक्षांनी केंद्र सरकार दक्षिणेतील राज्यांवर हिंदी लादत असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे अश्विनचे वक्तव्य एकदम चर्चेत आले आहे.

तुमच्या मार्गावर अढळ राहा
अश्विन याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्याने या प्रवासातील अनेक रोचक तथ्य आणि त्याच्या शिक्षणाविषयीचे अनुभव सांगितले. त्याने कधीच पराभव स्वीकारू नका. तुमच्या मार्गावर अढळ राहा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. जर अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मला कोणी म्हटले असते की, मी कर्णधार होऊ शकत नाही तर मी अधिक मेहनत केली असती असे त्याने सांगितले. त्याने विद्यार्थ्यांना ध्येयासाठी प्रेरित केले. विद्यार्थ्याने कधीच थांबता कामा नये. विद्यार्थ्याने नवीन काही शिकणे बंद केले तर यशस्वी हा शब्द एखाद्या अलमारीतच शोभून दिसेल, असा तो म्हणाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR