31.7 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeराष्ट्रीयहिंदी कवी विनोद शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार

हिंदी कवी विनोद शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार

छत्तीसगडच्या लेखकाचा प्रथमच सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
छत्तीसगडचे प्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोदकुमार शुक्ल यांना साहित्य जगतातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. छत्तीसगडमधील लेखकाला हा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबतची घोषणा नवी दिल्लीत करण्यात आली.

विनोदकुमार शुक्ल यांचा लगभग जय हिंद हा पहिला कवितासंग्रह १९७१ मध्ये प्रकाशित झाला. तेव्हापासून त्यांच्या लेखनीने साहित्य जगतात आपले स्थान निर्माण केले आहे. शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी राजनांदगाव येथे झाला. मणि कौल यांनी त्यांच्या नौकर की कमीज या कादंबरीवर एक चित्रपटही बनवला होता. त्यांचे नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे आणि दीवार में एक खिडकी रहती थी या कादंब-या हिंदीतील काही सर्वोत्तम कादंब-या मानल्या जातात. तसेच त्यांचे पेड पर कमरा आणि महाविद्यालय हे कथासंग्रहही खूप चर्चेत राहिले आहेत.

मराठीत कोणाला सन्मान
-१९७४ : वि. स. खांडेकर
-१९८४ : वि. वा. शिरवाडकर
-२००३ विंदा करंदीकर
-२०१४ : भालचंद्र नेमाडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR