30.8 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeक्रीडाराजस्थानचा ऐतिहासिक विजय

राजस्थानचा ऐतिहासिक विजय

कोलकाता : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर थरारक विजय मिळवला. आरआरच्या हातून सामना गेला असे वाटत असताना रॉव्हमेल पॉवेलच्या झंझावाताने केकेआरला बॅकफूटवर फेकले.

राजस्थान रॉयल्सचा आरआर आणि रोव्हमनचा फ असा आरआरआर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर जॉस बटलरचे वादळ घोंगावले आणि त्याने ५५ चेंडूंत शतक पूर्ण करून मॅच संपवली. हे त्याचे आयपीएलमधील सातवे शतक ठरले आणि त्याने ख्रिल गेलचा ( ६) विक्रम मोडला. राजस्थानने या विजयासह १२ गुण खात्यात जमा केले आणि पॉईंट टेबलच्या अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली.

यशस्वी जैस्वालने ( १९) अपयशाचा पाढा पुन्हा वाचला. दुस-या षटकात वैभव अरोराने त्याला ट्रॅप करून बाद केले. पाचव्या षटकात हर्षित राणाने फफ चा कर्णधार संजू सॅमसनला ( १२) माघारी पाठवले. इम्पॅक्ट प्लेअर जॉस बटलर व रियान पराग यांनी डाव सावरला आणि २३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ८व्या षटकात ६, ४ खाल्यानंतर हर्षितने चतुर गोलंदाजी केली आणि रियान आणखी एक उत्तुंग फटका खेचण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३४ धावा केल्या आणि यंदाच्या पर्वात ३०० हून अधिक धावा करणारा विराटनंतर तो दुसरा फलंदाज ठरला. ९ व्या षटकात सुनील नरीनने फफ ला चौथा धक्का देताना ध्रुव जुरेलची ( २) विकेट मिळवली.

रोव्हमन पॉवेल व शिमरोन हेटमायर हे दोन हिटर असताना आरआरने आर अश्विनला फलंदाजीत बढती दिली. त्यामुळे त्यांच्या धावांचा वेग मंदावला. अश्विन ११ चेंडूंत ८ धावा करून गेला आणि बटलरसह त्याने २२ चेंडूंत २१ धावा जोडल्या. वरुण चक्रवर्थीने पहिल्याच चेंडूवर हेटमायरला गोल्डन डकवर माघारी पाठवून ङङफ ला मोठे यश मिळवून दिले. राजस्थानाला ३६ चेंडूंत ९६ धावा करायच्या होत्या आणि सर्व आशा बटलरवरच होत्या. त्याने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि १५ व्या षटकात १७ धावा कुटल्या. आंद्रे रसेल गोलंदाजीला आला आणि त्याच्या पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या गेल्या.

रोव्हमनने १७ व्या षटकात नरीनचे ४,६,६, असे स्वागत केले, परंतु पाचव्या चेंडूवर नरीनने ही विकेट मिळवली. रोव्हमन १३ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २६ धावा चोपून गेला आणि त्याने १९ चेंडूंत ४६ धावा असे लक्ष्याच्या दिशेचे अंतर कमी केले. पुढच्या चेंडूवर ट्रेंट बोल्टचा झेल टाकला गेला. नरीनने ४ षटकांत ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने १८व्या षटकात १८ धावा दिल्या आणि १२ चेंडू २८ धावा असा सामना आला. १९व्या षटकात बटलरने १९ धावा कुटल्याने सामना आरआरच्या पारड्यात झुकला. वरुण चक्रवर्थीचा पहिला चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवल्यानंतर बटलरने तीन चेंडू निर्धाव खेळले. पाचव्या चेंडूवर २ धावा घेतल्यानंतर त्याच्या पायात क्रॅम्प आला. १ चेंडू १ धाव हवी असताना बटलरने चौकार खेचून थरारक विजय मिळवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR