28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडास्मृती मानधनाचा ऐतिहासिक विक्रम; भारताने जिंकली मालिका

स्मृती मानधनाचा ऐतिहासिक विक्रम; भारताने जिंकली मालिका

नवी दिल्ली : एकीकडे भारतीय पुरुष संघाने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले २ कसोटी सामने न्यूझीलंडकडून गमावले. दुसरीकडे, भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करत ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली आहे.

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर टीम इंडियाने सामना तसेच मालिकाही जिंकली. या सामन्यात स्मृती मानधनानेही शतक झळकावून नवा विक्रम रचला.

तिस-या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या न्यूझीलंड संघाला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. किवी संघ ४९.५ षटकांत २३२ धावांत गारद झाला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वांधिक ३ तर प्रिया मिश्राने २ बळी घेतले. न्यूझीलंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात काही खास नव्हती. सलामीवीर शेफाली वर्मा १६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर सलामीवीर स्मिती मानधना हिने यस्तिका भाटियासोबत अप्रतिम भागीदारी करत संघाची धावसंख्या १०० च्या जवळ नेली.

स्मृती मानधनाने ठोकले ऐतिहासिक शतक
यस्तिका भाटिया बाद झाल्यानंतर मानधनाला कर्णधार हरमनप्रीत कौरची उत्कृष्ट साथ लाभली. यादरम्यान मानधना एकदिवसीय सामन्यात शतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरली. तिने वनडे कारकिर्दीतील ८ वे शतक झळकावले. अशाप्रकारे वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी ती भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिने मिताली राजचा ७ वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढला.

महिला वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके
८ – स्मृती मानधना (८८ डाव)
७ – मिताली राज (२११ डाव)
६ – हरमनप्रीत कौर (११६ डाव)
स्मृती मानधनाने १२२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली. मानधना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने जेमिमासह ४४.२ षटकांत २३३ धावांचे लक्ष्य गाठले. अशा प्रकारे भारतीय संघाने एकदिवसीय मालिका २-१ अशी खिशात घातली. भारताने पहिला एकदिवसीय सामना ५९ धावांनी जिंकला तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR