30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeक्रीडायशस्वी जयस्वालने रचला इतिहास; रोहितची भविष्यवाणी उतरवली सत्यात

यशस्वी जयस्वालने रचला इतिहास; रोहितची भविष्यवाणी उतरवली सत्यात

वायझॅक : भारताचा २२ वर्षाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत १५२ चेंडूत शतकी खेळी केली. त्याने आपले हे शतक षटकार मारत पूर्ण केले. ज्यावेळी रोहित शर्मा १४ धावा आणि शुभमन गिल ३४ धावा करून बाद झाले त्यावेळी यशस्वीवरच भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आली होती.

यशस्वीने श्रेयस अय्यरसोबत ९० धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शतक ठोकूनही यशस्वी खेळपट्टीवर टिकून होता. मात्र अय्यरने २७ धावा करत त्याची साथ सोडली. आता पुन्हा यशस्वीवर भारतासाठी एक मोठी खेळी करण्याची जबाबदारी आली.

दरम्यान, यशस्वीबद्दल कर्णधार रोहित शर्माने काही वर्षापूर्वी भविष्यवाणी केली होती. त्याने यशस्वीच्या पोस्टवर कमेंट करताना पुढचा सुपरस्टार म्हणून यशस्वीचा उल्लेख केला होता. आज त्याने कर्णधारासमोरच शतकी खेळी करून त्याची भविष्यवाणी सत्यात उतरवली.

यशस्वी जयस्वालने आपल्या या शतकी खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार मारले. यशस्वी ८० च्या घरात पोहचल्यानंतर आक्रमक फटकेबाजी करत टॉम हार्टलीला सलग ३ चौकार मारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR