दक्षिण सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त होटगी जिल्हा परिषद गटातून होटगी ते सोलापूर मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये ११ गावांमधून मोठ्या प्रमाणात मोटरसायकली घेऊन युवक सहभागी झाले होते.
यावेळी कार्यकत्यांनी ‘दिलीपरावजी माने मालक ‘तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अबकी बार माने साहेब आमदार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या मोटारसायकल रॅलीमध्ये फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड, श्रीकांत मेलगे पाटील,
असिम शेख, अशपाक मुल्ला, सुभाष राठोड, शामराव देशमुख, मंगेश सोनकडे, सचिन होनमाने, सागर माने, रफिक पिरजादे, इंद्रजीत लांडगे, रहेमान तांबोळी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली जामगोंडी मंगल कार्यालय येथे विसर्जित होऊन याचे सभेमध्ये रूपांतर झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणेच काँग्रेस पक्षांला पक्षाला होटगी जिल्हा परिषद गटातून मताधिक्य देणार असून दिलीप माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे याप्रसंगी फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी सांगितले.