26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रएकाच महिलेला किती पदे?

एकाच महिलेला किती पदे?

रुपाली चाकणकरांवरून अजित पवार गटातील मतभेद उघड

पुणे : प्रतिनिधी
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत येताच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. रुपाली पाटील यांनी या विषयावर रोखठोक मत मांडले आहे. त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. हा विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचे काही नियम आहेत. यात डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सोशल वर्कर म्हणजे तज्ज्ञ लोकांची निवड हे आमदार निवडण्याचे नियम आहेत’ असे रुपाली पाटील म्हणाल्या.

दरम्यान, काल जी बातमी लागली, तो आमच्यासाठी धक्का होता. लोकशाही पद्धतीने कोणाचे नाव घेतले नाही. रुपाली चाकणकरांना संधी ही बातमी आल्यावर माझ्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिका-यांनी, कार्यकर्त्यांनी विचारणा केली. त्यावर आम्हाला सांगितलं ही बातमी पक्षाने दिलेली नाही, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

पुढे बोलताना पाटील म्हणाल्या, ‘मग अशा बातम्या येतात कुठून? कोणीही आमदारकीसाठी इच्छूक असू शकते. मी, वैशालीताई, सुरेखाताई ठाकूर, दीपकभाऊ मानकर, बाबा पाटील इच्छुक आहोत. रुपाली चाकणकर माझ्या दुश्मन नाहीत. त्यांच्याकडे ऑलरेडी महिला आयोगाचे अध्यक्षपद आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. मग या बातम्या येतात कुठून?’ असा सवाल रुपाली पाटील यांनी विचारला.

मी पण अजितदादांची लाडकी बहीण
अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली. मी पण अजितदादांची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार. याबाबत मी अजितदादांशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे, असे रुपाली पाटील म्हणाल्या. ‘एक व्यक्ती-एक पद’ असा निकष असला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR