22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेस मोठा प्रतिसाद

ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेस मोठा प्रतिसाद

परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शिष्यवृत्ती परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या मनातील नवीन परीक्षा केंद्राची भीती दूर व्हावी व शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशाने शिष्यवृत्ती सराव परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेकरिता ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

ही परीक्षा ज्ञानसाधना नीट आणि जेईई फाउंडेशन परभणी व इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मांडाखळी या दोन परीक्षा केंद्रावर आयोजित केली होती. सदरील परीक्षा इंग्रजी व मराठी माध्यमा करिता आयोजित केली होती. विद्यार्थ्यांच्या मनातील नवीन परीक्षा केंद्राबद्दलची भीती, प्रश्नपत्रिका सोडवितांना वेळेचे नियोजन इ.सर्व बाबींचा सराव झाल्याचे समाधान पालक व विद्यार्थी संवादातून दिसून आले. यावेळी सर्व विद्यार्थी व पालक यांना ज्ञानसाधना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.

सदरील परीक्षा संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के व संस्था सचिव प्रा.सौ.शितल सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. परीक्षा प्रमुख डी. एस. शेळके व पी.बी.डोंबे यांनी परीक्षेचे उत्तम नियोजन केले होते. तसेच सर्व समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न झाली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR