16.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीशिवसेना उबाठा पक्षात शेकडो तरुणांचा जाहीर प्रवेश

शिवसेना उबाठा पक्षात शेकडो तरुणांचा जाहीर प्रवेश

परभणी : आ. डॉ. राहूल पाटील यांच्या विकासाभिमूख नेतृत्वावर विश्वास दाखवत शहरातील भीमनगर परिसरातील सामाजिक कार्यात कार्यरत असणारे पवन घाडगे व त्यांच्या शेकडो सहका-यांनी आ. डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या सर्व तरूणांचा सत्कार करण्यात आला.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमनगर युवा मंच यांच्या वतीने घाडगे यांच्या पुढाकारातून भव्य भिमगित संगीत रजनी व महिला मंडळ सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परभणी विधानसभेचे आ. डॉ. राहुल पाटील, सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, माजी नगरसेवक प्रशास ठाकूर, जेष्ठ नेत्या राणुबाई वायवळ, उपशहर प्रमुख संभानाथ काळे, आरोग्य समन्वयक राहूल कांबळे, आयोजक पवन घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बौध्द धम्म कार्यात सक्रिय कार्य करणा-या महिला मंडळांना बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते महिला मंडळाच्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायिका प्रीती भालेराव यांनी बुद्ध आणि भीमगीत सादर करत उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक राहुल कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार आयोजक पवन घाडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पलाश घाडगे, अमित काळे, सम्राट हतागळे, राहुल खरात, आदित्य घाडगे, विनोद कनकुटे, आशिष गवारे, अभिनव मुळे, भारत वाहुळे, सुमित काळे, अप्पाराव गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR