पालम : तालुक्यातील वाणी पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या सांगवी (थंडी) गावचे पुनर्वसन करावे अशी मागणी दि. ११ रोजी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. गावचे पुनर्वसन न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पालम तालुक्यातील वाणी पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत सांगवी (थडी) गाव असून या गावाला गोदावरी नदीसह पूर्णा नदीच्या पाण्याचा धोका निर्माण होत आहे. पावसाळ्यात बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे प्रशासकीय अधिका-यांनी याची तात्काळ दखल घेत गोदावरी नदी काठावरील वास्तवेत असलेल्या गावाचे तात्काळ पुनर्वसन करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार वाघमारे यांच्याकडे देण्यात आले आहे.
या निवेदनावर सभापती गजानन रोकडे, हनुमंत सोनटक्के, तुकाराम पाटील, बापूराव ठाकूर, मुरलीधर ठाकूर, उत्तमराव ठाकूर, कोंडीबा ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, गोपाळ ठाकूर, अमोल ठाकूर, मोतीराम ठाकूर, रामदास ठाकूर, तुळशीराम ठाकूर, बालाजी ठाकूर यासह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.