28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तान संसद त्रिशंकू

पाकिस्तान संसद त्रिशंकू

कोणत्याही पक्षाला बहुमत नाही अपक्षांचा ९० जागांवर विजय

इस्लामाबाद : पाकिस्­तानमधील निवडणूक निकाल आता स्­पष्­ट होत आहेत. कोणताही एका पक्षाला जनतेने स्­पष्­ट बहुमत दिलेले नाही. त्­यामुळे संसद त्रिशंकू अवस्­थेत आहे. इम्रान खान यांना पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवारांनी ९० पेक्षा अधिक जागा जिंकल्­या आहेत. नवाज शरीफ यांचा पक्ष ७२ जागांसह दुस-या क्रमांकावर आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी सत्ता स्­थापनेच्­या हालचाली सुरु केल्­या आहेत.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण ३३६ जागा आहेत. त्यापैकी २६५ जागांवर निवडणूक झाली. एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे तर एका जागेचा निकाल नियमभंगामुळे फेटाळण्यात आला आहे. येथे १५ फेब्रुवारीला पुन्हा मतदान होणार आहे. उर्वरित ७० जागा राखीव आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १३४ जागांवर बहुमत असणे आवश्यक आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन), पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या तीन पक्षांमध्ये स्पर्धा आहे.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने आतापर्यंत २६५ पैकी २५५ जागांचे निकाल जाहीर केले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्­या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या समर्थक उमेदवारांनी नॅशनल असेंब्लीच्या सर्वाधिक ९० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षाने ७३ तर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ५४, मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) १७ आणि इतर जागा छोट्या पक्षांनीही आपले अस्तित्व दाखवले आहे. इम्रान खान आणि नवाझ शरीफ या दोघांनीही निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR