विशाखापट्टणम : सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. नेहमी कोणती ना कोणती भन्नाट घटना किंवा हास्यास्पद व्हीडीओ समोर येत असतात. आता एक हास्यास्पद तितकीच धक्कादायक व्हीडीओ नेटक-यांपर्यंत पोहोचत आहे. खरे तर विशाखापट्टणममध्ये एका महिलेने आपल्या पतीला दुस-या महिलेसोबत रंगेहाथ पकडले अन् एकच गोंधळ घातला. पतीने आपला विश्वासघात केला असल्याचा आरोप करत तिने पतीच्या प्रेयसीला मारहाण केली. संबंधित पत्नीला पतीचे हे प्रेमप्रकरण आधीच समजले होते. त्यामुळे तिने सोबत कुटुंबीयांना आणले आणि पतीचा खरा चेहरा उघड केला.
विवेक दुस-या महिलेसोबत रंगेहाथ सापडल्याने घरच्यांनी त्याला मारहाण केली. मात्र, त्याने पत्नीला सोडून दिल्याचा दावा करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. संबंधित पती विवेक हा एका स्पामध्ये काम करतो. तिथे तो दुस-या महिलेच्या प्रेमात पडला. त्याने तिला महागड्या भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय हे दोघे शहरातील समुद्रकिनारे, उद्याने आणि हॉटेल्समध्ये फिरत असत. विवेकने पत्नीशी भांडण झाले असल्याचे सांगून प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याचे सांगितले.
घरच्यांनी दिला चोप
विवेक आणि त्याच्या प्रेयसीचे दोन वर्षांपासून हे अफेअर सुरू असल्याचे पत्नीने उघड केले. तिला याबद्दल संपूर्ण माहिती होती पण भविष्यात विवेक बदलेल या आशेवर त्याची पत्नी होती. त्या दोघांमधील वाढती जवळीक पाहून तिने विवेकच्या प्रेयसीला धमकावले आणि त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण तिने दुर्लक्ष केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील विशाखापट्टणम येथून अशीच घटना समोर आली होती. इथे नक्षत्रा नावाच्या महिलेने ३० मे २०२४ रोजी विशाखापट्टणम येथील पतीच्या कार्यालयासमोर न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन केले.
संबंधित महिला नक्षत्राने तिच्या पतीला एका खोलीत अन्य महिलेसोबत रंगेहाथ पकडले. याच रागातून तिने त्याला मारहाण देखील केली. तिचा पती तेजा याने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले असल्याचा आरोप तिने केला. २०१३ मध्ये नक्षत्रा आणि तेजा एका चित्रपटाच्या शूंिटगदरम्यान प्रेमात पडले. मग त्यांनी २०१७ मध्ये लग्न केले. दोघांना एक अपत्य आहे. पती तेजा हा मागील काही दिवसांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप नक्षत्राने केला.