23.3 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeराष्ट्रीयशारीरिक संबंधाच्या अधिकारासाठी पती कोर्टात

शारीरिक संबंधाच्या अधिकारासाठी पती कोर्टात

नवी दिल्ली : शारीरिक संबंधाच्या अधिकारासाठी एक प्रकरण गुजरात हायकोर्टात गेले आहे. नोकरीच्या निमित्ताने पतीपासून दूर राहणा-या महिलेने हायकोर्टात धाव घेतली आहे. महिन्यातीत दोन साप्ताहिक सुट्या पतीसोबत घालवल्याने वैवाहिक कर्तव्य पूर्ण होत नाही का? अशी विचारणा महिलेने केली आहे. विशेष म्हणजे पतीने याआधी आपल्या पत्नीविरोधात फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती.

महिलेच्या पतीने हिंदू वैवाहिक कायदा कलम ९ अंतर्गत शारीरिक संबंधांच्या अधिकारासाठी सुरतच्या फॅमिली कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती. पत्नीने आपल्या जवळ येऊन राहावे यासाठी कोर्टाने आदेश द्यावे अशी मागणी पतीने केली होती. सदर जोडप्याला एक लहान मुल देखील आहे. पतीने याचिकेत म्हटले आहे की, त्याची पत्नी त्याच्यासोबत दररोज राहत नाही. मुलाच्या जन्मानंतर ती नोकरीच्या निमित्ताने आपल्या आई-वडिलांजवळ राहते. पत्नी केवळ महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या हफ्त्यात त्याला भेटायला येते. इतरवेळी ती आपल्या आई-वडिलांसोबत पाहते. पत्नी मुलाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून वैवाहिक अधिकारांपासून मला वंचित ठेवत नोकरी करत आहे.

पत्नीला सोडल्याचा पतीचा दावा
पतीची याचिका रद्द करावी यासाठी महिलेने हाय कोर्टात धाव घेतली. पतीने दाखल केलेली याचिका चालवण्या योग्य नाही असे महिलेने म्हटले. पत्नीने म्हटले की, ती महिन्यातील दोन दिवस नियमित पद्धतीने पतीच्या घरी जाते. पती दावा करतोय की त्याने मला सोडले आहे. कोर्टाने महिलेची मागणी फेटाळली आहे. तसेच याप्रकरणी सुनावणीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

महिलेनेही दाखल केला दावा
महिलेच्या वकीलाकडून कोर्टात दावा करण्यात आलाय की, हिंदूू विवाह कायद्याच्या कलम ९ नुसार पती-पत्नी वेगळे झाले असते तरच त्यांना वैवाहिक कर्तव्य पूर्ण करण्यास सांगितले जाऊ शकते. पत्नी दर दुस-या आठवड्यात पतीला भेटण्यासाठी जाते. त्यामुळे ते वेगळे झालेत असे म्हणता येत नाही. दरम्यान, कोर्टाने २५ जानेवारीपर्यंत पतीला उत्तर देण्यास सांगितले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR