22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाहैदराबाद विरुध्द कोलकाता अंतिम लढत

हैदराबाद विरुध्द कोलकाता अंतिम लढत

चेन्नई : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला असून राजस्थान रॉयल्सला त्यांनी क्वालिफायर २ मध्ये पराभूत केले. तर सहा वर्षांनी हैदराबादचा संघ आता अंतिम सामना खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे.

शाहबाज अहमद व अभिषेक शर्मा या फिरकी गोलंदाजांना हैदराबादच्या विजयाचे श्रेय जाते. क्वालिफायर १ मध्ये केकेआर विरुध्द एचआरएस खेळले होते आणि आता पुन्हा फायनलमध्ये हे दोन्ही संघ भिडतील. यशस्वी जैस्वाल व टॉम कॅडमोर (१०) यांनी सावध सुरुवात केली होती, परंतु पॅट कमिन्सने ही जोडी तोडली. यशस्वी २१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर झेलबाद झाला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर कमिन्सने रणनीती बदलली.

शाहबाज अहमदने यशस्वीला माघारी पाठवल्यानंतर अभिषेक शर्माने त्याच्या पहिल्या षटकात संजू सॅमसन ( १०) स्वस्तात बाद केले. त्यानंतर शाहबाजने एकाच षटकात दोन धक्के देताना रियान पराग ( ६) व आर अश्विन ( ०) यांना माघारी पाठवले. अभिषेकने अप्रतिम चेंडूवर शिमरोन हेटमायरचा ( ४) त्रिफळा उडवला आणि आरआरला ९२ धावांवर सहावा धक्का दिला. शाहबाजने ४ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर अभिषेकने ४-०-२४-२ अशी स्पेल टाकली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR