26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमनोरंजनमी मराठी मुलगा असल्याचा अभिमान

मी मराठी मुलगा असल्याचा अभिमान

अभिनेता जॉन अब्राहम याचे प्रतिपादन

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम याने मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अभिनेता हा त्याच्या फिटनेससाठीही चर्चेत असतो. आपल्या चाहत्यांनाही तो नेहमी हेल्दी आणि फिट राहण्याासाठी प्रोहत्सान देत असतो. यासाठी त्याचे खूप कौतुकही होते. नुकतेच त्याने नशामुक्त नवी मुंबई या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या अभियानाच उद्घाटन मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. अंमली पदार्थांच्या विरोधातील या अभियानात संवाद साधताना जीवनात शिस्तबद्ध राहण्याचा सल्ला जॉन अब्राहमने विद्यार्थ्यांना दिला.

नशामुक्त नवी मुंबई या अभियानातील भाषणादरम्यान जॉन अब्राहाम म्हणाला की, मी माझ्या आयुष्यात कधीही अंमली पदार्थांना स्पर्श केलेला नाही. धूम्रपान करू नका, दारू पिऊ नका आणि ड्रग्ज घेऊ नका. जीवनात खूप शिस्तबद्ध असणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या सहका-यांसाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आदर्श बना. माझ्याकडे लांब भाषण देण्यासाठी वेळ नाही, पण मी तुम्हाला फक्त शिस्तबद्ध राहण्याचा सल्ला देईन. या देशाचे आणि भारताचे चांगले नागरिक बना. यासोबत भाषणाच्या शेवटी जॉनने मी एक मराठी मुलगा आहे आणि याचा मला गर्व आहे असे म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

जॉन अब्राहमच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ऍक्शन थ्रिलर वेदा मध्ये दिसला होता. आता तो तेहरान या २०२५ मध्ये प्रदर्शित होणा-या सिनेमामध्ये झळकणार आहे. अभिनेत्याने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिस्म चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक हीट चित्रपट दिले. तो अक्षय कुमारसोबत देसी बॉईज, हाऊसफुल २, धूम, बाबुल, नो स्मोकिंग, दनादन गोल, दोस्ताना आणि न्यूयॉर्क सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR