30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रमला माझं तिकिट कन्फर्म; कामाला लागा

मला माझं तिकिट कन्फर्म; कामाला लागा

रोहिणी खडसेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

जळगाव : प्रतिनिधी
आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील असतील यांच्या माध्यमातून त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. नक्कीच या मतदारसंघामध्ये लढण्याची माझी तयारी चालू आहे. मला माझं तिकिट कन्फर्म आहे एवढे माहीत आहे. मला पक्षाने आदेश दिलेले आहेत. तुम्ही कामाला लागा अशा सूचना रोहिणी खडसे यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, मला समोरच्यांच्या परिस्थितीबाबत अजून माहीत नाही.

कारण अजून तळ्यात-मळ्यात ऐकायला येत आहे. कोण कुठलं चिन्ह घेणार, कोण कुठल्या पक्षावर लढणार अजून सगळ्यात संभ्रम मला दिसतो आहे. पण शेवटी काय आहे जे ज्या पक्षावरती असतील, ज्या चिन्हावरती असतील, जे कुणी समोरचे उमेदवार असतील आम्ही सगळे नेते आणि पक्षाचे पदाधिकारी येत्या निवडणुकीसाठी सज्ज झालेलो आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR