27.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeराष्ट्रीयमाझा एकही नाही सांसद, तरी मला हवं मंत्रिपदं!

माझा एकही नाही सांसद, तरी मला हवं मंत्रिपदं!

रामदास आठवलेंची मागणी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिस-यांदा एनडीए सरकार स्थापन होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत एनडीएला २९२ जागा मिळाल्या. भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत. तर, भारत आघाडीला २३४ जागा मिळाल्या. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नैतिक पराभव असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. दरम्यान सत्तास्थापनेच्या गडबडीत रामदास आठवले यांनी मात्र ‘‘माझा एकही नाही सांसद, माझा एकही नाही सांसद, तरी मला हवं मंत्रिपद’’ असे म्हणत केंद्रात स्थापन होणा-या एनडीए सरकारमध्ये मंत्रीपदाची मागणी केली आहे.

दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षे आपले सरकार चालेल, असा विश्वास एनडीएमधील घटक पक्षांना व्यक्त केला. सत्तास्थापनेच्या गडबडीत रामदास आठवले यांनी केंद्रात स्थापन होणा-या एनडीए सरकारमध्ये मंत्रीपदाची मागणी केली आहे. आठवले अशा पक्षाचे अध्यक्ष आणि नेते आहेत ज्यांच्याकडे फक्त एक खासदार आहे आणि तेही राज्यसभेत, रामदास आठवले स्वत: राज्यसभेचे खासदार आहेत, लोकसभेत भारतीय रिपब्लिकन पार्टीचा एकही खासदार नाही. विशेष म्हणजे यावेळी आठवले यांच्या पक्षाने निवडणूकही लढवली नाही.

आठवलेंनी मंत्रिपदाची मागणी केली. ते म्हणाले, मी ८ वर्षे राज्यमंत्री आहे, आता मला केंद्रीय मंत्रीपद मिळाले आहे. आरपीआय म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. बाबासाहेबांचे संविधान वाचवण्यासाठी मोदींनी अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद मिळावे, अशी आमची यावेळी मागणी आहे. याचे कारण म्हणजे मी सलग ८ वर्षे राज्यमंत्री असून माझा पक्ष देशभरात काम करतो आणि नेहमीच प्रामाणिकपणे एनडीएसोबत राहिलो आहे. महाराष्ट्रातही आम्ही स्वत: निवडणूक लढवली नसून एनडीएला मनापासून पांिठबा दिला. अशा परिस्थितीत मलाही मंत्रिमंडळात पद मिळायला हवे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्यासाठी योग्य असे मंत्रालय शोधा, असा सल्लाही दिला. त्यांना सामाजिक न्याय मिळाला तर मोठी गोष्ट आहे, त्याशिवाय कामगार मंत्रालय किंवा अल्पसंख्याक मंत्रालय मिळाले तर तेही चांगले होईल, असे आठवले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR