22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयमी प्रभू श्रीरामाचा आदर करतो

मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो

हैदराबाद : लोकसभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, राम मंदिराच्या मुद्यावरून देशात काय सुरू आहे? बाबरी मशीद जिंदाबाद होती, आहे आणि राहील. मोदी सरकार हे केवळ एका धर्माचे सरकार आहे का? की सगळ्या धर्मांना मानणारे सरकार आहे? २२ जानेवारीचा आनंद साजरा करून तुम्ही कोट्यवधी मुसलमानांना काय संदेश देत आहात? एका धर्माने दुस-या धर्मावर विजय मिळवला, असे सरकारला सांगायचे आहे का? देशातील १७ कोटी मुस्लिमांना तुम्ही काय संदेश देत आहात? १९९२, २०१९, २०२२ मध्ये मुस्लिमांचा विश्वासघात केला, मी बाबर, औरंगजेब, जिना यांचा प्रवक्ता नाही.

लोकसभेत राम मंदिराची उभारणी आणि अभिषेक सोहळा या विषयावरील चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, मला विचारायचे आहे की, मोदी सरकार हे एका विशिष्ट समुदायाचे, धर्माचे सरकार आहे की संपूर्ण देशाचे सरकार आहे? भारत सरकार हा माझा धर्म आहे का? मला वाटते की या देशाचा कोणताही धर्म नाही. मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो, पण मी नथुराम गोडसेचा तिरस्कार करतो कारण त्याने अशा व्यक्तीला मारले ज्याचे शेवटचे शब्द हे राम असे होते.

नथुरामचा तिरस्कारच
६ डिसेंबर १९९२ नंतर देशात दंगली उसळल्या होत्या. अनेक तरुणांना तुरुंगात टाकले आणि ते वृद्ध म्हणूनच बाहेर आले. मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो. पण मी नथुरामचा तिरस्कार करतो कारण त्याचे शेवटचे शब्द हे राम होते अशा व्यक्तीला त्याने मारले. बाबरबद्दल ओवेसीला का विचारता? बोस, नेहरू आणि आपल्या देशाबद्दल विचारायचे असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR