पुणे प्रतिनिधी – मतदारांची भाषा मला समजते. त्यामुळे त्यांचे प्रश्न संसदेत मांडणार आहे. निवडणुकीत मी एकटी नाही. बारामती हे माझे कुटुंब आहे, अशी प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
निवडणुका येतात आणि जातात. पण त्या झाल्यावर संबंध सुधारतील असे नमूद करून त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाच्या मुद्यावर भूमिका घेतली आहे. मतदारसंघातील मतदारांशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने विजयी होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.