22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनमी राजकारणात नक्कीच येणार

मी राजकारणात नक्कीच येणार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचे मोठे वक्तव्य

मुंबई : एकीकडे विधानसभा निवडणुकीची राज्यात धामधूम सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. अलिकडेच आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत तिच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. आता मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ताने राजकारणात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे.

प्राजक्ता माळी तिच्या ‘फुलवंती’ या सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ता अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या राजकीय प्रवेशाबाबत हिंट दिली आहे. मी नक्कीच राजकारणात येणार आहे. पण, सध्या माझ्यासाठी ही वेळ योग्य नाही, असे मला वाटते. राजकारणात आल्यावर तुमच्याकडे निर्णय घेण्याची ताकद येते. त्यामुळे कोणालाही राजकारणात यावसे वाटते. लोकांची काम करण्याची संधी मिळते. मला समाजसेवा करण्यासाठी राजकारणात यायचे आहे. पण, त्याआधी या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करून मगच राजकारणात प्रवेश करेन असे प्राजक्ता म्हणाली.

प्राजक्ताच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा याआधीही अनेकदा रंगल्या आहेत. प्राजक्ता अनेक राजकीय नेत्यांबरोबर व्यासपीठावरीह दिसली आहे. तिच्या काही कार्यक्रमांना राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. त्यामुळे प्राजक्ताच्या मनसे प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार रॅलीतही प्राजक्ता दिसली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही भेटी तिने घेतल्या होत्या. त्यामुळे प्राजक्ता भाजपात प्रवेश करते की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

दरम्यान, प्राजक्ताने ‘फुलवंती’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. तर स्रेहल तरडेंनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘फुलवंती’मध्ये प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, स्रेहल तरडे, प्रसाद ओक, हृषिकेश जोशी अशी स्टारकास्ट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR