29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeराष्ट्रीयपरदेशी महिलांसोबत सापडला आयएएस अधिका-याचा पती

परदेशी महिलांसोबत सापडला आयएएस अधिका-याचा पती

लुधियाना : पंजाबच्या लुधियाना येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील सराभा नगर परिसरात पोलिसांनी छापेमारी केली असता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. खरे तर भारतीय प्रशासकीय सेवेतील(आयएएस) एका अधिका-याच्या पतीला एका खोलीत पकडल्यानंतर तिथे अनैतिक देहविक्री व्यवसाय चालवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती, ज्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांना तिथे छापा टाकला. संबंधित आरोपीची पत्नी महिला आयएएस यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे.

दरम्यान, सराभा नगरमध्ये नेहमी काही लोक परदेशी महिलांसोबत ये-जा करत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. आयडीच्या माध्यमातून येथील हॉटेल्समध्ये रूम्स देखील दिल्या जात होत्या. स्थानिक लोकांकडून सूचना मिळताच पोलिसांना हॉटेलवर छापा टाकला तिथे काही लोक परदेशी महिलांसोबत आढळली. पोलिसांनी दोन पुरूष आणि दोन महिलांना रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी चौकशी केली असता यातील एका व्यक्तीची पत्नी ही पंजाबमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी संबंधित महिला आयएएस अधिका-याला फोनवरून याबाबत माहिती दिली. मग आयएएस अधिका-याने आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील या भागात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. स्पा सेंटरचा मालक आणि व्यवस्थापक ग्राहकांना मुलींचा पुरवठा करत होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR