28.6 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रआईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग

आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग

मुंबर्ई : तुम्हाला चॉकलेट खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता चॉकलेट महागणार आहे. कारण चॉकलेट बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या कोको बीन्सच्या किमती वाढणार आहेत, त्यामुळे चॉकलेटच्या किमती वाढू शकतात. भारतात कोको बीन्सची किंमत सुमारे १५०-२५० रुपये प्रति किलो आहे जी ८०० रुपयांपर्यंत वाढली आहे.

केवळ चॉकलेट निर्मातेच नव्हे तर अमूल, आइस्क्रीम ब्रँड बास्किन रॉबिन्स आणि अगदी स्रॅक निर्माते आणि इतर कंपन्यांवरही कोकोच्या वाढत्या किमतींचा परिणाम होणार आहे. अमूल ब्रँडचे मालक असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे एमडी जयेन मेहता यांनी सांगितले की, अमूल आपल्या चॉकलेट्सच्या किमती १० ते २० टक्क्यांनी वाढविण्याचा विचार करत आहे.

कोकोची किंमत पाच पटींनी वाढली
एमडी जयेन मेहता म्हणाले, भारतात एक किलो कोको बीन्सची किंमत १५० रुपयांवरून २५० ते ८०० रुपयांपर्यंत वाढली आहे. आमच्याकडे डार्क चॉकलेटचा बाजारातील सर्वांत मोठा हिस्सा आहे. अमूलने सध्या आईस्क्रीम आणि शीतपेयांच्या किमती कायम ठेवल्या आहेत आणि चॉकलेटच्या वाढत्या किमतीमुळे त्याचा बाजारातील हिस्सा कमी होईल असे वाटत नाही.

अमूल चॉकलेटची किंमत किती वाढू शकते?
अमेरिकन आइस्क्रीम ब्रँड बास्किन रॉबिन्स देखील त्याच्या किमती कायम ठेवण्याचा विचार करत आहे. याशिवाय सध्याच्या किमती स्थिर ठेवण्याचे हॅवमोरचे उद्दिष्ट आहे. अहवालानुसार, अमूलचे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन चॉकलेटच्या किमतीत १०-२० टक्के वाढ करण्याचा विचार करत आहे.
अमूल सध्या आपल्या आईस्क्रीमच्या किमतीत कोणतेही बदल करत नसले तरी चॉकलेटच्या वाढलेल्या किमतींचा बाजारातील शेअरवर नकारात्मक परिणाम होणार नाही अशी आशा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR