24.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा

मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा

आ. खोसकर यांनी घातली पक्षश्रेष्ठींना साद

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच नाचक्की झाली. या निवडणुकीत काँग्रेसची तब्बल आठ मते फुटल्याची चर्चा रंगत आहे. यामध्ये माजी काँग्रेस नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असलेले आमदार आणि इतर काही आमदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचंही नाव या यादीत घेतलं जाऊ लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून माझी बदनामी थांबवा असे आवाहन केले आहे.

विधानपरिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हिरामण खोसकर म्हणाले की माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याची बदनामी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्ष हायकमांडने थांबवली पाहिजे. माझ्यावर कारवाई करायची असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी मतदान चेक करा. मी फुटलो, असे जे सांगितले जात आहे ते पक्षाने आणि प्रसारमाध्यमांनी थांबवले पाहिजे असे आवाहन खोसकर यांनी केले आहे.

निष्ठा नसणा-यांना किंमत मोजावी लागणार
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलेल्या सात आमदारांच्या नावासह मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आजच अहवाल पाठवला आहे. या आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाची दारे बंद असतील, लवकर त्यांच्यावर पक्ष कठोर कारवाई करेल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ज्यांनी कालच्या निवडणुकीत पक्षाची साथ सोडली त्यांना किंमत मोजावी लागेल. चंद्रकांत हंडोरे जून २०२२ मधील राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तेव्हाही काही जणांनी पक्षाशी गद्दारी केलेली होती. त्यावेळी चौकशी समितीही नेमलेली होती, त्यावेळी पक्षाला दगा देणारे आमदार याहीवेळी तसेच वागले. आणखी काही नावे त्यात जोडली गेली, असे पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR