24.4 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्र३ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिका-यांची तात्काळ बदली करा

३ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिका-यांची तात्काळ बदली करा

मुंबई : कार्यालयात ३ वर्षांपेक्षा जास्त ज्या अधिका-यांची सेवा झाली त्यांना तात्काळ बदला असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसांत बदल्या करा, असे आदेश दिले असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद आज पार पडली. यामध्ये निवडणुकीच्या संदर्भातील महत्वाची माहिती त्यांनी दिली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरुष मतदार हे ४.९५ कोटी आहेत. तर स्त्री मतदार हे ४.६४ कोटी आहेत. तसेच दिव्यांग ६.३२ लाख आहेत. तर थर्ड जेंडर मतदार हे ५९९७ आहे. याचबरोबर पहिल्यांदा मतदान करणारे मतदार हे १९.४८ लाख आहेत. जो सभेसाठी मैदान मिळण्यासाठी अर्ज करेल त्याला मैदान देण्याची संधी दिली जाईल. अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.

दिवाळी आणि छट पूजा हे सण लक्षात घेऊन तारखा जाहीर कराव्यात अशी या पक्षांनी विनंती केल्याची माहिती निवडणूक आयोगानं केली आहे. पक्षांनी अशी देखील विनंती केली की मोबाईल सोबत असल्यामुळं अनेकांना मतदान करता आले नव्हते, त्यामुळे विधानसभेला याचा विचार व्हावा. मतदानासाठी जाताना मोबाईल परवानगी नाही. मात्र सोबत जर मतदार मोबाईल घेऊन गेला असेल तर तो ठेवण्याची व्यवस्था करावी अशी देखील विनंती पक्षांनी केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. फेक न्युज वाढत आहे त्याचा बंदोबस्त करण्या बाबत देखील सांगण्यात आले आहे.

मतदारांना करता येणार तक्रार
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अ‍ॅप जारी करण्यात आले आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR