सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाचेएसटी स्थानक हे नेहमी गजबजलेले पाहायला मिळते. यामुळे एसटी स्थानक हे नेहमी उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असते. पण, या स्थानकावरील एजंटगिरी बंद झाल्यास एसटीच्या उत्पन्नात आणखी भर पडू शकते. पण, याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात तर बुडत आहे, शिवाय राज्याचे महसूलही बुडत आहे. यामुळे एसटी प्रशासनाकडून पोलिसांना वारंवार कारवाईचे पत्र दिले जाते, पण कारवाई होत नाही अशी माहिती अधिका-यांनी दिली.
प्रवाशांच्या सोईसाठी राज्यभर एसटी सेवा सुरू आहे. जिथे जिथे एसटी स्थानक आहेत, तेथे खासगी वाहनांच्या संगान लागलेले चित्र पाहायला मिळतो पण, या गाड्या एसटी स्थानक परिसरात लागतातच, शिवाय त्या वाहनांचे एजंटही बेधडकपणे स्थानकात येतात. तेथील एसटीचे वाहक-चालकांच्या समोर प्रवाशांना घेऊन जातात. काहीवेळा त्यांच्याकडून एसटीच्या तिकिटाच्या जास्त तिकीट आकारले जाते, पण अनेकवेळा प्रवाशांना तक्रार कोठे करावी याची कल्पना नसते, यामुळे ते मुकाट्याने त्रास सहन करतात, अशी माहिती जाणकारांनी दिली.
पुणे मार्गावर सोलापूर आगारातून दररोज प्रत्येक तासाला गाड्या जातात. प्रवाशांची संख्या ही जास्त असते, पण प्रवाशांच्या सोबत एसटी स्थानकात तीन ते चार एजेंट पाहायला मिळतातच. त्याच परिसरात पोलिस चौकी आहे, पण तेही त्यांना विरोध करत नाहीत, असे चित्र नेहमीच असते अशी माहिती कर्मचा-यांनी दिली. सोलापूर एसटी स्थानकातही प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण, स्थानकात प्रवाशांच्या तुलनेत एजंट फिरत असतात. तेथील नेहमी प्रवाशांना खोटे बोलून संबंधित ठिकाणी आता गाडी नाही, तेथून लवकर जात नाही, असे विविध कारण सांगत प्रवाशांना स्थानकातून बाहेर नेतात.
तेथे गेल्यानंतर जवळपास तासभर एखादी गाडी प्रवाशांनी भरल्याशिवाय पुढे नेत नाहीत. यामुळे याचा फटका प्रवाशांना बसतो, अशी माहिती जाणकारांनी दिली.एसटी स्थानकात एजंटगिरी वाढल्याने याचा फटका एसटीच्या उत्पन्नावर होतो. यामुळे हा फटका बसू नये, यासाठी एसटी प्रशासनाकडून प्रत्येक पंधरा दिवसांना पोलिसांना एजंटावर कारवाई करण्याबाबत पत्र पाठवले जाते. पण, पोलिसांकडून नेहमीप्रमाणे कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप कर्मचा-यांनी केला.