21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरइम्तियाज जलील भाजपची बी टीम

इम्तियाज जलील भाजपची बी टीम

एमआयएममध्ये उभी फूट

छ. संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षात मोठी फूट पडली आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष गफ्फार कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इम्तियाज जलील हे भाजपची बी टीम असून ते फडणवीस सांगेल, तसा पक्षाचा वापर करतात असे कादरी म्हणाले.

इम्तियाज जलील हे भाजप, शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात पैसे खातात, असा आरोपही कादरी यांनी केला. तसेच जलील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नांदेड नाही तर फडणवीस यांच्या विरोधात नागपूरमधून निवडणूक लढवून दाखवावे, असे आव्हानदेखील कादरी यांनी दिले. शिवाय हिंमत असेल तर माझ्या विरोधात लढा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कादरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये आपल्याला पक्षात डावलले जात असून, इम्तियाज जलील यांच्याकडून आपली उमेदवारी कापून भाजपच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता.

यापुढे पक्षात राहायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी कादरी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गफ्फार कादरी यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती.असदुद्दीन ओवैसी आणि अकबर ओवैसी यांच्याकडे तक्रार करूनदेखील आपल्याला न्याय मिळत नाही नसल्याचे कादरी यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांचे म्हणणे ऐकून लवकरच आपण निर्णय घेणार असल्याचे कादरी म्हणाले होते.

कोण आहेत गफ्फार कादरी?
गफ्फार कादरी एमआयएम पक्षातील महत्वाचे नेते आहेत. एमआयएमध्ये गफ्फार कादरी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांनी दोनवेळा निवडणूक लढवली होती. गफ्फार कादरी यांचा 2014 मध्ये चार हजार मतांनी पराभव झाला होता. तर, 2019 मध्ये 14 हजार मतांनी पराभव झाला होता. भाजप मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात त्यांना दोनवेळा पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR