23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयआंध्र प्रदेशात विधानसभेचीही रणधुमाळी

आंध्र प्रदेशात विधानसभेचीही रणधुमाळी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचीही घोषणा झाली आहे. त्यामुळे, काँग्रेसकडून आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत ७८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेसाठी १३ मे रोजी आंध्र प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, आंध्र प्रदेशात विधानसभेच्या १७५ जागांसाठी निवडणूक होत आहे.

आंध प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागांसाठी निवडणूक होत असून येथे आयएसआर काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, टीडीपी आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने मैदानात तयारी सुरू केली आहे. त्यातच, विधानसभा निवडणुकांसाठी आज काँग्रेसने पहिल्या ७८ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे, आता इतरही पक्षांच्या उमेदवारांची विधानसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची घोषणा लवकरच होऊ शकते. दरम्यान, सध्या आंध्र प्रदेशमध्ये आयएसआर काँग्रेसची सत्ता असून जगनमोहन रेड्डी तेथील मुख्यमंत्री आहेत. तर, यंदाच्या निवडणुकीत भाजपानेही टीडीपी आणि जनकल्याण पक्षासोबत युती केली असून जगनमोहन रेड्डींना आव्हान दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR