21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeमहाराष्ट्रदाऊदच्या खेडमधील ३ मालमत्तांचा लिलाव

दाऊदच्या खेडमधील ३ मालमत्तांचा लिलाव

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडममधील संपत्तीचा लिलाव झाला. या लिलावात दाऊदचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरीतील खेड तालुक्यातील बंगले आणि आंब्याच्या बागा यांचा समावेश आहे. याआधी दाऊदच्या मुंबईतील काही मालमत्तांचा लिलाव झाला होता. त्यानंतर आताच्या यादीत रत्नागिरी येथील मालमत्तेचा समावेश आहे.

स्मगलर्स फॉरेन एक्स्चेंज मॅन्यूपुलेटर्स अंतर्गत दाऊदची संपत्ती जप्त करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात मुंबके गावात दाऊदची ही संपत्ती आहे. दाऊदचे बालपणीचे घर आणि त्याच्या कुटुंबाच्या तीन संपत्तींचा यात समावेश आहे. दाऊदच्या आईच्या नावावरील रजिस्टर संपत्ती ४ वर्षापूर्वी जप्त केली. या सगळ््या प्रॉपर्टीची किंमत १९ लाखांच्या आसपास होती. दाऊदच्या चारही संपत्तीच्या लिलावाला आज दुपारी २ वाजता सुरुवात झाली. बंद लिफाफे उघडून लिलावाला सुरुवात करण्यात आली. आयकर भवनात हा लिलाव करण्यात आला. उच्च बोली लावणा-याला दाऊदची मालमत्ता मिळणार होती. या चारही मालमत्ता खेडमधील आहेत.

दाऊदच्या ४ प्रॉपर्टी लिलावासाठी काढण्यात आल्या होत्या. ४ पैकी ३ नंबरच्या जमिनीसाठी ४ जणांनी अर्ज केला होता. चौथ्या जमिनीसाठी ३ जणांनी अर्ज केला होता. दाऊदच्या ३ नंबरच्या जमिनीचा लिलाव २.०१ कोटी रुपयात झाला तर ४ नंबरच्या प्रॉपर्टीचा लिलाव ३.२८ लाख रुपयात झाला. विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आधीच अर्ज करून ही जमीन विकत घेण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR