19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात मंडलिकांनी ठोकला शड्डू

कोल्हापुरात मंडलिकांनी ठोकला शड्डू

कोल्हापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक जागांवरून संघर्षाची ठिणगी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कागलमध्ये समरजीत घाटगे यांनीही तुतारी हाती घेतली होती.

मात्र, आता कागल विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येते. कारण, कागलमधून आता शिवसेना पक्षानेही दंड थोपटले आहेत. आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाच वीरेंद्र मंडलिक यांनी केली आहे. हसन मुश्रीफांनीच राजकारणात आपला पाय ओढल्याचा आरोप करत वीरेंद्र मंडलिक यांनी त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला आहे.

दरम्यान, कारण, कालच चिंचवडमधील जागा आपल्याकडेच घ्यावी, यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील समर्थकांनी त्यांची भेट घेऊन आग्रह धरला आहे.

तसेच, ही जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास आपण इतर उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची भूमिकाही राष्ट्रवादीच्या समर्थकांनी घेतली आहे. दुसरीकडे विद्यमान आमदारांना जागा सोडण्यात येईल, या नियमानुसार महायुतीमधील इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत.

त्यामुळे, महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीलाच सोडली जाईल. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात आला आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक कागलमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनीच जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मंडलिक गटाच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच, गेली २५ वर्षे हसन मुश्रीफ आमदार आहेत. त्यामुळे, आता त्यांच्याबद्दल मतदारसंघात अँटी इन्कमबन्सी आहे.

कागलमधील नैसर्गिक जागा शिवसेनेची, त्यामुळे महायुतीत जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचेही वीरेंद्र्र मंडलिक यांनी यावेळी म्हटले. त्यामुळे, महायुतीत पुन्हा एकदा कागलच्या जागेवर ठिणगी पेटणार असल्याचे दिसून येते.

हसन मुश्रीफ व समरजित घाटगेंमुळे १४ हजारांची लीड
हसन मुश्रीफ यांनी कायम खेकड्याप्रमाणे माझे पाय ओढले, तर लोकसभा निवडणुकीत देखील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोघांनीही प्रामाणिकपणे काम केले नाही, असा आरोपच मंडलिक यांनी केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुती ओबीसीद्वेषी असे नरेटिव्ह तयार करण्यात आले, पण दलित, मुस्लिम समाजाला महायुतीने समान न्याय दिला.

लोकसभेचे तिकिट मिळवण्यासाठी २० ते २२ दिवस वाट बघायला लागली, जे तुतारीकडे गेले त्यांच्यामुळे ही वाट बघायला लागली. स्वकीयांच्या वागण्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला. लोकसभेला आमच्या विरोधात असलेले संजयबाबा घाटगे यांनी आता मुश्रीफ यांना पाठिंबा दिला, समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांना जनक घराणे आणि आताचे घराणे एकच आहे, तुम्हाला काय करायचं ते करा असे सांगितले.

मुश्रीफ साहेब यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना शाहू महाराजांना मदत करण्याचे सांगितले. समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी प्रामाणिक काम केले नाही, म्हणून कागलमध्ये आमची लीड १४ हजार झाल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापरही वीरेंद्र मंडलिक यांनी कागलमधील या दोन्ही नेत्यांवर फोडले आहे. त्यामुळे, महायुतीमधील हा तिढा कसा सुटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR