32.8 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeराष्ट्रीयमणिपूरमध्ये ४०० जणांनी पेटवले पोलिस अधीक्षकांचे कार्यालय

मणिपूरमध्ये ४०० जणांनी पेटवले पोलिस अधीक्षकांचे कार्यालय

इंफाळ : मणिपूरमध्ये सुमारे वर्षभरापासून सुरु असलेला हिंसाचार अद्यापही थांबवण्याच नाव घेत नाहीए. अधुमधून पुन्हा जमावाकडून हिंसाचाराच्या घटना इथे घडत आहेत. त्यामुळे इथली कायदा सुव्यवस्था पार देशोधडीला लागली.

याचे एक ताजे उदाहरण समोर आले आहे ते म्हणजे ४०० जणांच्या जमावाने चक्क पोलिस अधीक्षकांचे कार्यालयचे पेटवून दिले आहे. याचा एक व्हीडीओदेखील समोर आला आहे. विशेष म्हणजे या व्हीडीओत जाळपोळ करतान एक पोलीस कॉन्स्टेबल दिसून आला आहे. मणिपूरमधील परिस्थिती आता स्थानिक पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे. कायदा आणि सुव्यवस्था इथं पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यातच एक कुकी पोलिस कॉन्स्टेबलचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हा पोलिस आधीक्षकांचे कार्यालय जाळण्यात त्याचाही सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

हा व्हीडीओ समोर येताच या पोलिस कर्मचा-याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, चिंतेची बाब ही आहे की ज्या ठिकाणी आज ंिहसाचार झाला आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी अर्थात दुरचांदपूर इथे मोठा ंिहसाचार झाला होता. त्यामुळं हा भाग सध्या खूपच संवेदनशील बनला आहे. यापूर्वी देखील इथं ंिहसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. यावेळी परिस्थिती अधिक चिघळली आहे कारण हिंसाचार करणा-यांनी दगडफेकही केली आहे. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR