जयपूर : राजस्थानमधील लोकसभेच्या २५ जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. भाजप १४ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने आघाडीवर असलेल्या सहा जागांवर विजय मिळवला आहे. तसेच काँग्रेसने आघाडीच्या आठ जागांपैकी तीन जागांवर विजय मिळवला आहे. त्याचवेळी, सीपीआय (एम), आरएलटीपी आणि बीएपी पक्षाचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
भाजपचे विजयी उमेदवार
अजमेर – भगीरथ चौधरी
जयपूर – मंजू शर्मा
उदयपूर – मन्नालाल रावत
पाली – पी. पी. चौधरी
जालोर – लुंबाराम
झालावाड -दुष्यंत सिंह
काँग्रेसचे विजयी उमेदवार
ढोलपूर – करौली भजनलाल जाटव.
दौसा – मुरारीलाल मीना
भरतपूर – संजना जाटव