मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असताना आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मीही सह्या करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. या दोघांच्या ताठर भूमिकेमुळे मंत्रिमंडळ बैठकीत काही मिनिटे तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.
आधीच अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. आता त्यात अजितदादांनीही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धूसफूस बाहेर आल्याचे दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नगरविकास खात्याच्या फाईलवरून ही खडाजंगी झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत असलेली नगरविकास खात्याची फाईल वाचल्याशिवाय सही करणार नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलवरही मी सही करणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री असा वाद सुरू होता. नंतर हा वाद मोठ्या आवाजात सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत काही मिनिटांसाठी तणावपूर्ण वातावरण असल्याचे दिसून आले. आधीच अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडवल्याचे समोर येत आहे. त्यावरून अजितदादांचे मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अजितदादांनीही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धूसफूस बाहेर आल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांच्यावर शिंदेंचा मंत्री भडकला
हा वाद सुरू असताना शिवसेनेच्या मंत्र्याने अजित पवारांवर मोठा आरोप केला. माझ्या विभागाच्या फाईलवरती तुम्ही निर्णय का घेत नाही, असे सांगत शिवसेनेच्या मंत्र्याने अजितदादांना लक्ष्य केले. ही फाईल माझ्या हिताची नसून लोकांच्या हिताची आहे असे सांगत शिवसेनेचा मंत्री अजित पवारांवर भडकल्याचे दिसले.
राष्ट्रवादीच्या १५ ते २० फाईल मुख्यमंत्र्यांकडे अडकल्या!
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या अनेक फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची माहिती समोर आली आहे. शिवभोजन थाळीचा वाढीव प्रस्ताव व यासारख्या १८ ते २० महत्त्वाच्या फाईल अडकल्याची माहिती आहे. त्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. सत्तेत तीन पक्ष एकत्रित आल्याने पुन्हा एकदा निधी वाटप, विभागाच्या फाइल्स यावरून वाद वाढला आहे.