मुंबई : प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण यांची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख आहे. अनेकदा त्याचे नाव कोणत्या ना कोणत्या वादाशी जोडले जाते. काही दिवसांपूर्वी ‘इंडियन आयडॉल’ या शोदरम्यान गायक किशोर कुमार यांच्या मुलासोबत त्याचा वाद झाला होता. आता तो एका लाईव्ह शोमध्ये एक फॅन्सवर भडकला आहे. चक्क त्याने त्याचा मोबाईल हिसकावून घेत फेकून दिला आहे. यामुळे आदित्यला जोरदार ट्रोंिलगचा सामना करावा लागत आहे.
एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, नुकताच गायक आदित्य नारायण छत्तीसगडला एका कॉलेजच्या संगीत महोत्सवात परफॉर्म करण्यासाठी गेला होता. जिथे त्याला पाहण्यासाठी आणि त्याचे गाणे ऐकण्यासाठी अनेक चाहत्यांची गर्दी केली होती. यावेळी स्टेजवर आदित्यने ‘डॉन’ चित्रपटातील एक गाण्यास सुरूवात केली. यावेळी गर्दीतील एका फॅन्सने त्याचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोष्टीचा आदित्य राग आला आणि तो त्याच्यावर भडकला. एवढंच नाही तर आदित्यने त्याचा मोबाईल हिसकावून घेत लांब फेकून दिला आहे. या लाईव्ह शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.