22.8 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या दोन गटात बारामती, इंदापुरात टस्सल

राष्ट्रवादीच्या दोन गटात बारामती, इंदापुरात टस्सल

पुणे : विनायक कुलकर्णी
विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि मनस, अपक्ष निवडणुकीच्या मैदानात असले तरी देखील ज्या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी-राष्ट्रवादी अशी समोरासमोर लढत होत आहे तेथील लढत रंगतदार आणि निकालाची उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे, असे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये बारामती आणि इंदापूर या मतदार संघाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

बारामतीत उत्कंठा : बारामती विधानसभा मतदार संघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यामध्ये तर इंदापूर विधानसभा मतदार संघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यामध्ये होणारी लढत लक्षवेधी ठरणारी आहे. एकेकाळी जिल्ह्यात आणि शहरात विरोधी पक्षाचे एक अथवा दोन आमदार निवडून येत असत. मात्र राजकीय परिस्थिती जशी बदलत गेली त्याचे प्रतिबिंब हे शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर उमटत राहिले आणि पुण्यासह पिंपरी,चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी विरोधी पक्ष असणा-या भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढत गेला आणि भारतीय जनता पक्षाच्या विस्तारीकरणाला वाव मिळाला.

बारामती विधानसभा मतदार संघाचा विचार करता येथील लढत रंगतदार आणि उत्सुकतापूर्ण असणारी आहे दिवाळीतील पाडव्याला याच मतदार संघात प्रथमच दोन स्वतंत्र मेळावे झाले असल्याचे दिसले, तर जेष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती मतदार संघात जाहीर सभा घेत राजकारणातील निवृत्तीचे संकेत दिले. गेली अनेक वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. एकाच परिवारातील दोन उमेदवार समोरासमोर उभे आहेत म्हणून ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे.

इंदापूर मतदार संघ : इंदापूर विधानसभा मतदार संघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्ता भरणे ही परंपरागत दुरंगी लढत होत असली तरी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे निवडणुकीच्या रिंगणात एकूण २४ उमेदवार असूनही मुख्य लढत तीन उमेदवारामध्ये होणे शक्य आहे.

अपक्ष उमेदवार माने यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक कामे केली तर गेल्या वेळच्या निवडणुकीत माने हे आमदार भरणे यांच्याबरोबर होते मात्र यावेळच्या निवडणुकीत चित्र वेगळे दिसते आहे. त्यामुळे बारामती मतदार संघाप्रमाणे इंदापूर मतदार संघात होणारी लढत लक्षवेधी ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR