परभणी : मानवत तालुक्यातील रामपुरी बु येथील श्री चिंतामणी गणपती मंदिराच्या सभागृहाचे लोकार्पण आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते संपन्न झाले. आ.दुर्राणी यांच्या माध्यमातून या सभागृहाच्या बांधकामासाठी ३० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.
रामपुरी बु ग्रामस्थांची अनेक दिवसांची सभागृहाची मागणी होती. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन या सभगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या सभागृहाचे काम पूर्ण झाल्यावर गावातील विविध धार्मिक कार्यक्रम तसेच लग्न समारंभ या सभागृहात पार पडणार असून त्यामुळे ग्रामस्थांचा आर्थिक भार कमी होईल. या उद्घाटन प्रसंगी गुलाबराव यादव, संचालक मध्यवर्ती बँक दत्त्तराव मायंदळे, सरपंच डिघोळ ई अजय देशमुख, सरपंच मंगरूळ जमीर पठाण, सरपंच हटकरवाडी बाबासाहेब जोरवर, तालुका युवक अध्यक्ष अन्वर शेख, सरपंच केकरजवळा मदन लाडाने, अल्प संख्याकचे तालुका अध्यक्ष शेख, वझुर खुचे हनुमान शिंदे, गुलाब शेख, दत्तराव साखरे, अनिलराव रोडे, गावातील शैलेश यादव,
माउली नाईक महाराज, माणिकराव डोके, बालासाहेब डोके, गंगाधर नाईक, मधुकरराव यादव, विलासराव यादव, रामप्रसाद यादव, सोनू यादव, निलेश यादव, सखाराम यादव, माणिकराव यादव, प्रकाश वाघ, प्रभाकरराव यादव, भगवानराव यादव, मोबीन शेख, भुरू भाई, सुनील यादव, दशरथ चव्हाण, त्रिंबक यादव, बाबाराव यादव, रावसाहेब यादव, श्रीधर नाना यादव, चेअरमन रामपुरी बु रणजित यादव, बालासाहेब यादव, प्रसाद यादव, साहेबराव यादव, माउली यादव शिर्शीकर, परमेश्वर यादव, निवर्ती यादव, रामा चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, शिवाजीराव यादव, राजेश्वर यादव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत विशाल विठ्ठलराव यादव यांनी प्रयत्न केले. आभार प्रदर्शन व सूत्र संचालन प्रशांत शिंगाडे यांनी केले.