सोलापूर – ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त श्री सिध्देश्वर देवस्थान यात्रा समितीच्यावतीने येथील होम मैदानावर आयोजित ५३ व्या राज्यस्तरीय श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जि.प.चे कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, आत्माचे निवृत्त उपसंचालक विजयकुमार बरबडे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अमोल शास्त्री, प्रदीप गोंजारी, प्रा. डी. व्ही. इंडी, वेदमूर्ती बसवराजशास्त्री हिरेमठ, स्मार्ट एक्स्पोचे सोमनाथ शेटे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करून गेल्यानंतर कृषी विभागाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने म्हणाले, जगभरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त लोकरे यांनी केले आहे. मदतीने शेती केली जात आहे. शेतकऱ्यांनीही आधुनिकतेची कास धरावी. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्हावी या हेतूने श्री सिध्देश्वर देवस्थान समिती व शासनाच्या कृषी विभाग यांच्या संयुक्तपणे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शनही केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष चाकोते यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी बरबडे म्हणाले, या प्रदर्शनात सुमारे साडेतीनशे स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी याची माहिती या मिळणार आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामतीचेही या प्रदर्शनासाठी सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी काही स्टॉलस्ना भेटी देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले.