18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी सेविकांचा प्रोत्साहनपर भत्ता रखडला

अंगणवाडी सेविकांचा प्रोत्साहनपर भत्ता रखडला

‘लाडकी बहीण’ चे अर्ज भरलेले मानधनही मिळाले नाही

पुणे : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणा-या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये देऊ, असा शासन निर्णय ही योजना सुरू झाली तेव्हा घेण्यात आला होता.
लाडक्या बहिणींना चक्क पाच हप्ते देखील मिळाले. मात्र, ज्यांच्यामुळे लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल झाले, त्या अंगणवाडी सेविकांना मात्र अद्यापही त्यांच्या हक्काचे प्रोत्साहनपर भत्त्याचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे हे पैसे अंगणवाडी सेविकांच्या हाती केव्हा पडणार? हे गुलदस्त्यातच आहे.

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. त्यानुसार दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले. या योजनेचा प्रतिसाद पाहता, ही मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. दोन महिने अर्ज भरल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणा-या प्रोत्साहनपर भत्त्यावर बोलण्यासाठी शासनाला वेळच नाही. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र, ज्यांच्यामुळे ही योजना यशस्वी झाली आहे, त्या अंगणवाडी सेविकांचा शासनाला विसर पडला आहे. दिवाळीपूर्वी तरी ही रक्कम मिळावी, अशी अंगणवाडी सेविकांनी मागणी केली आहे.

अर्ज भरण्याचे प्रत्येकी ५० रुपये मिळणार कधी?
जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणा-या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे ७ हजार पाचशे रुपये जमा झाले. मात्र, अर्ज भरणा-या अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचे ५० रुपयांप्रमाणे मिळणारे मानधन अजूनही मिळालेले नाही

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR