29.7 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeराष्ट्रीययुनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत गरबा नृत्याचा समावेश

युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत गरबा नृत्याचा समावेश

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले की, गुजरातमधील लोकप्रिय गरबा नृत्याचा समावेश युनेस्कोने ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा (आयसीएच) च्या प्रतिनिधी यादीत केला आहे. भारताने गुजरात आणि देशाच्या इतर भागांमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या गरब्याला यादीत समाविष्ट करण्यासाठी नामांकित केले होते. पटेल यांनी म्हटले आहे की, गरबाच्या रूपात देवीची भक्ती करण्याची जुनी जुनी परंपरा जिवंत असून ती वाढत आहे. गुजरातची ओळख बनलेल्या गरबाला युनेस्कोने आपल्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत मान्यता दिली आहे.

पटेल म्हणाले की, जगभरात पसरलेल्या गुजरातींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या परंपरेला महत्त्व देऊन असा वारसा जगभर नेण्याचा हा परिणाम आहे. गुजरातच्या जनतेचे अभिनंदन. कसाने, बोत्सवाना येथे सुरू झालेल्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या सुरक्षेसाठी आंतरशासकीय समितीच्या १८ व्या बैठकीत, २००३ मधील अधिवेशनाच्या तरतुदींनुसार या यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR