24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeसोलापूरशालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश

शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश

पंढरपूर/प्रतिनिधी
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये बेदाण्याचा समावेश करावा. याबाबतचे पत्र महाराष्ट्र शासनाने नुकतेच पारित केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार असून मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या तिन चार वर्षांपासून बेदाण्याला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व कोल्ड स्टोरेज मध्ये बेदाणा पडुन असून त्यामुळेच दर ही पडले आहेत.

या निर्णयाचे स्वागत पंढरपूर येथे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने साखर वाटून करण्यात आले.
याप्रसंगी युवक नेते प्रणव परिचारक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुभाष मस्के,प्रदेश सचिव
भाजप किसान मोर्चा माऊली हळनवर, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, रंजीत जाधव, अक्षय वाडकर, वैभव लिंगे यांच्यासह बेदाणा उत्पादक शेतकरी व बाजार समितीचे संचालक,भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत सद्यस्थितीत तांदळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. तसेच सदर अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांकडून नियमित आहारामध्ये एक दिवस विद्याथ्यर्थ्यांना फळे, सोयाबिस्कीट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात पूरक आहार देण्याचे निर्देश शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ अन्वये दिले आहेत.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन शेतकरी आहेत. राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक आहारामध्ये बेदाण्याचा लाभ देत आहेत. त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मध्ये नमूद केल्यानुसार नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून फळे, सोयाबिस्कीट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात लाभ देण्याबाबत आपल्या स्तरावरुन पुनःश्च सर्व शाळा, केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना लेखी निर्देश देण्यात याव्येत. असे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिला आहे. या निर्णयाचे स्वागत पंढरपुरात स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळनवर म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकरी चळवळील कार्यकर्ते बेदाण्याचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा अशी मागणी करत होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या दूरदृष्टीतून व सोलापूर जिल्ह्य़ाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नाला यश आले असून याबाबत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची मागणी मान्य केल्याने द्राक्ष बागायतदार शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या वतीने माऊली हळनवर यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR