27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरमुस्लिम बहुल भागात भाजपच्या मतांमध्ये वाढ

मुस्लिम बहुल भागात भाजपच्या मतांमध्ये वाढ

आकडेवारीने खोडला ‘व्होट जिहाद’चा दावा

लातूर : विशेष प्रतिनिधी
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा उल्लेख केला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी १४ जागांवर फडणवीस यांनी व्होट जिहाद झाल्याचे म्हटले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला खरेच व्होट जिहादचा सामना करावा लागला का? याचे उत्तर थेट आकडेवारीतून समोर आले आहे.

महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा जागांपैकी या ३८ मतदारसंघांमध्ये मुस्लिम लोकसंख्या २० टक्के आहे. त्यातील नऊ मतदारसंघामध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण ११.२४ कोटी लोकसंख्येपैकी १.३ कोटी मुस्लिम आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या ३८ जागांपैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी ११ जागा ज्ािंकल्या होत्या. शिवसेनेने नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन आणि समाजवादी पार्टी, एआयएमआयएमने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.

२० मतदार संघात भाजपची मते वाढली
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत, महायुतीला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा मोठा भाग असलेल्या ३८ विधानसभा मतदारासंघापैकी निम्म्याहून अधिकांमध्ये जास्त मते मिळाली आहेत. २० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेले महाराष्ट्रात विधानसभेचे ३८ मतदारसंघ आहेत. यापैकी २० मतदारसंघात भाजप आणि मित्रपक्षांची लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

संभाजीनगर, परभणी, बीडमध्ये महायुतीची १० टक्के मते घटली
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्ािंकलेल्या रावेरमध्ये भाजपची सर्वाधिक २०.१३ टक्के मते वाढली आहेत. दुसरीकडे, मानखुर्द, भिवंडी पश्चिम, भायखळा, छत्रपती संभाजीनगर मध्य, अकोट, परभणी आणि बीड या मतदारसंघामध्ये महायुतीच्या मतांची टक्केवारी १० टक्क्यांनी घटली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR