22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeराष्ट्रीयअल्पवयीन मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ

- पॉर्न पाहणे गुन्हा आहे का? - सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील अश्लील मजकूराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. बालरोग शल्यचिकित्सक संजय कुलश्रेष्ठ यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह साहित्य असू नये याची केंद्र सरकारने खात्री करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. अशी सामग्री लैंगिक गुन्ह्यांना प्रोत्साहन देते तसेच मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून याचा प्रचार केला जात असून अल्पवयीन मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याचे कारण बनत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. मात्र, अशा आशयाचे प्रकरण न्यायालयात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा परिस्थितीत भारतात अश्लिल मजकूर पाहणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील आशिष पांडे म्हणतात की, भारतात अश्लील साहित्याबाबत अनेक कायदे आहेत. आरोपी कोणत्या प्रकारचा मजकूर पाहत आहे आणि तो कुठे पाहतोय यावर काय शिक्षा होईल हे अवलंबून आहे. कारण हे मोठे घटक आहेत. उदाहरणार्थ, जर एखादा प्रौढ सामान्य पोर्न सामग्री पाहत असेल जो त्या विशिष्ट लक्ष्य गटासाठी तयार केला गेला असेल, तर तो गुन्हा नाही. यासाठी कोणतीही शिक्षा नाही.

ही वैयक्तिक पसंतीची बाब
भारतीय राज्यघटनेत गोपनीयतेशी संबंधित काही तरतुदी आहेत, ज्यांच्या अंतर्गत त्या गोष्टी बेकायदेशीर असल्याशिवाय त्यावर बंदी घालता येत नाही. न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केरळ उच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी केली होती. असे प्रकरण गुन्ह्याच्या श्रेणीत आणता येणार नाही, असे ते म्हणाले होते. ही व्यक्तीच्या वैयक्तिक पसंतीची बाब आहे. अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे हे नागरिकांच्या गोपनीयतेत हस्तक्षेप करण्यासारखे आहे.

अश्लील मजकुरावर शिक्षा होणार
काही खास प्रकारचा अश्लील मजकूर आहे, तो पाहणे गुन्हा आहे. जर कोणी चाइल्ड पोर्नोग्राफी पाहत असेल किंवा एखाद्या महिलेसोबत काहीतरी चुकीचे वागत असेल तर ते गुन्ह्याच्या श्रेणीत येते. यासाठी आरोपींना शिक्षा होऊ शकते. त्याच बरोबर चाइल्ड पोर्नोग्राफी पाहिल्यास पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षेचीही तरतूद आहे.

किती वर्षांच्या शिक्षेची तरतूद?
आयटी कायद्याच्या कलम ६७ नुसार हा नियम न पाळल्यास ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित कलम ६७ अ आणि ६७ इ नुसार अशी सामग्री खासगीत पाहणे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. अशा वेळी मी एकटाच पाहत होतो, असेही म्हणता येणार नाही. तसेच फोनवर फोटो सर्च करून ते सोशल मीडियावर पोस्ट करणेही गुन्हाच आहे. आयपीसी कलम २९२ नुसार, जर कोणी पोर्नोग्राफी सामग्री तयार किंवा वितरित करत असेल, तर तो गुन्हा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR