21.6 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रइंदापूरचा सुपरस्टार ‘सिकंदर’चा मृत्यू

इंदापूरचा सुपरस्टार ‘सिकंदर’चा मृत्यू

पुणे : लग्नकार्य म्हणा किंवा कोणता सोहळा म्हणा घोड्याचा उल्लेख निघतोच. अशाच एका घोड्यासंदर्भात एक हृदयद्रावक बातमी इंदापुरातून समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावात निलेश अष्टेकर या शेतक-याने लहानपणापासून सांभाळ केलेल्या नुकरा प्रजातीतील ‘सिकंदर’ नावाच्या घोड्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.

दरम्यान, देशभरात प्रसिध्द असा पांढरा शुभ्र, उंच घोडा म्हटलं की इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील शेतकरी निलेश अष्टेकर यांच्या सिकंदरने नावलौकिक मिळविला होता. काल (शुक्रवारी) ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्याने अष्टेकर कुटुंबातील एक सदस्य गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्याला संपूर्ण गावाक-यांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.

‘सिकंदर’चा देशातीत उंच घोड्यांमध्ये उल्लेख झाला होता. त्याचे वय साधारण ९ वर्षे इतके होते. ‘सिकंदर’च्या नावावर अनेक रेकॉर्ड देखील होते. पंजाबवरून त्याला आणण्यात आले होते. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तब्बल २५ वर्षे घोड्यांच्या उच्च जात कुळीचा अभ्यास केल्यानंतर निलेश अष्टेकर यांनी इंदापूर तालुक्यातील अकोले गावाची या स्टड फार्मसाठी निवड केली. ‘सिकंदर’ला पाहायला राज्याच्या व देशाच्या कानाकोप-यातून अश्वप्रेमी यायचे. या घोड्याला एका कंपनीने चक्क ७० लाख रुपयांची बोली लावली होती. हा घोडा प्रजननासाठी वापरला जायचा. त्याच्या एका वेळेच्या प्रजननाच्या प्रक्रियेचा खर्च ३१ हजार रुपयांपर्यंत आकारला जायचा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR