नवी दिल्ली : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे इंडिया आघाडीची बुधवारी होणारी दिल्लीतील बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. सुरुवातीला ममता बँनर्जी आणि नितीश कुमार या बैठकीला अनुपस्थितीत राहणार नसल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तामिळनाडूचे स्टॅलिनही गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली असून ती १८ किंवा १९ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत इंडिया अलायन्सची बैठक होणार होती. काँग्रेसने ही बैठक बोलावली असून त्यात विरोधी पक्षांचे बडे नेते सहभागी होणार होते. मात्र आता अनेक नेते उपस्थित न राहिल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. वास्तविक, पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला झाला. तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या हिंदी बेल्ट असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव स्वीकारावा लागला आहे.
या निवडणुकीत इंडिया आघातील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतले नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज आहेत. तसेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असे स्टॅलिन यांनी कळवल्याचे काँग्रेसने सांगितले. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे.