27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeक्रीडाभारताने ३-१ ने मालिका घातली खिशात

भारताने ३-१ ने मालिका घातली खिशात

रांची : भारताने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दिलेले १९२ धावांचे आव्हान ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार करत मालिका खिशात टाकली. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने ८४ धावांची सलामी दिली. मात्र इंग्लंडच्या फिरकीपटूंनी त्यानंतर भारताची अवस्था ५ बाद १२० धावा अशी केली होती. मात्र शुभमन गिलने संघ अडचणीत सापडला असताना संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याला ध्रुव जुरेलने उत्तम साथ देत ३९ धावा करत ७२ धावांची भागीदारी रचली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR