नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ असा पराभव केला. भारताने मालिकेतील शेवटचा सामना ६० धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने मोठा विक्रम केला. संघाने स्वत:च्याच सर्वोच्च टी २० धावसंख्येचा विक्रम मोडला.
यावेळी स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी अप्रतिम कामगिरी केली. या दोघींनी अर्धशतके झळकावली. मानधनाने ७७ आणि घोषने ५४ धावा केल्या. वास्तविक भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या दरम्यान संघाने २० षटकांत ४ गडी गमावून २१७ धावा केल्या. ही महिला टीम इंडियाची सर्वात मोठी टी २० धावसंख्या ठरली. स्मृती मानधना आणि उमा छेत्री त्याच्यासाठी सलामीला आल्या. मात्र उमा शून्यावर बाद झाली. तर मानधनाने ४७ चेंडूत ७७ धावा केल्या. ज्यात तिने १३ चौकार आणि १ षटकार मारला. तर दुसरीकेड तिस-या स्थानावर आलेल्या रिचा घोषने २१ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. ज्यात तिने ३ चौकार आणि ५ षटकार मारले.
तर आखेरीस राघवी बिष्टने नाबाद ३१ धावा केल्या. टी २० मध्ये भारतीय महिला संघाची सर्वोच्च धावसंख्या २०१ होती. युएईविरुद्ध संघाने ही खेळी खेळली होती. भारताने २० षटकांत ५ गडी गमावून २०१ धावा केल्या होत्या. मात्र आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. टीम इंडियाची सर्वात मोठी धावसंख्या २१७ धावा ठरली आहे. यापूर्वी भारताने इंग्लंड महिलांविरुद्धच्या सामन्यात १९८ धावा केल्या होत्या. ही संघाची तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारताने तिस-या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजचा ६० धावांनी पराभव केला. यासह मालिकाही जिंकली. ज्यामध्ये स्मृती मानधनाला मालिकावीर खेळाडू म्हणून निवडण्यात आले. या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ती अव्वल स्थानावर आहे. मानधनाने ३ सामन्यात १९३ धावा केल्या. तिने या तीनही सामन्यात अर्धशतक झळकावली.