नवी दिल्ली : हवामान बदलाला तोंड देण्याची तातडीची गरज लक्षात घेता हरित क्षेत्रासाठी ठोस पावले उचलण्यात भारत जागतिक नेता म्हणून उदयास आला आहे. २०२३ हे वर्ष या संदर्भात एक महत्त्वाचे वर्ष ठरले असून शाश्वत भविष्याची निर्मिती करण्यासाठी भारताची वचनबद्धता दर्शवते. सीओपी२८ (पक्षांची परिषद) मध्ये भारत हा एकमेव देश आहे जो आपले २०३० एनडीसी उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या आणि ओलांडण्याच्या मार्गावर आहे. भारताने २००५ ते २०१९ दरम्यान त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीनुसार उत्सर्जनाची तीव्रता ३३ टक्यांनी यशस्वीरित्या कमी केली आहे.
अशाप्रकारे, भारताने २०३० साठी प्रारंभिक एनडीसी उद्दिष्टे, नियोजित वेळेच्या आधी गाठली आहेत. भारत सीओपी२८ मध्ये युएईसह ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्हचे सह-यजमान आहे. भारताने सीओपी२८ मध्ये ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह लाँच केले, ज्याने नाविन्यपूर्ण पर्यावरण कार्यक्रम आणि साधनांसाठी जागतिक व्यासपीठ तयार केले. या वर्षी नवी दिल्ली घोषणेचा भाग म्हणून जी२० देशांनी हरित विकास करार स्वीकारला आहे.
राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, २०२३ अंतर्गत, भारताचे उद्दिष्ट ऊर्जा क्षेत्रात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन, वाहतूक आणि वापरामध्ये एक प्रमुख जागतिक देश म्हणून प्रस्थापित करण्याचे आहे. यामुळे ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जसाठी निर्यातीच्या संधी देखील निर्माण होतील. तसेच वाघ, सिंह, हिम तेंदुए, प्यूमा, जग्वार आणि चित्ता यांच्या नैसर्गिक अधिवासांना कव्हर करणार्या ९७ श्रेणीच्या देशांमध्ये पोहोचण्याचे या आघाडीचे उद्दिष्ट आहे. आयबीसीए वन्य प्राण्यांच्या, विशेषतः मोठ्या मांजरींच्या संवर्धनासाठी जागतिक सहकार्य आणि प्रयत्नांना आणखी बळकट करेल.
जगातील सर्वात मोठे सोलर पार्क
भाडला सोलर पार्क ५७०० हेक्टर (२२ चौरस मैल) पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले आहे. त्याची एकूण क्षमता २२४५ मेगावॅट आहे. हे जगातील सर्वात मोठ्या सौर उद्यानांपैकी एक आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ च्या सात सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक म्हणजे देशातील हरित औद्योगिक आणि आर्थिक परिवर्तन, पर्यावरणपूरक शेतीसाठी हरित विकास आणि शाश्वत ऊर्जा. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रीन नोकऱ्या निर्माण होतील.
शाश्वत जीवन पद्धतींना प्रोत्साहन
प्रतिष्ठित जी२० व्यासपीठ वापरून हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सहयोगी जागतिक कृतीचा पुरस्कार करण्यासाठी भारत २०२३ मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मिशन लाईफ सारखे उपक्रम जगभरात शाश्वत जीवन पद्धतींना प्रोत्साहन देत आहेत.